डोंबिवलीत स्फोट झाल्याच्या घटनेला आता दोन दिवस झाले आहेत. यामधे आत्तापर्यंत ११ मृत्यू झाले आहेत. शोधकार्य करत असणाऱ्या एनडीआरएफच्या जवानांना काही मानवी अवशेष सापडले आहेत. काही अवशेष ढिगाऱ्यांखाली तर काही आसपासच्या कंपन्यांमध्ये आढळून आले. तेव्हा तिसऱ्या दिवशीही हे शोधकार्य सकाळी सुरू करण्यात आले आहे.