कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोटार चालकाला धमकावल्या प्रकरणी बांधकाम व्यवसायिक सुरेंद्र अगरवाल यांना गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. बांधकाम व्यावसायिक अगरवाल यांनी धमकावून डांबून ठेवल्याची फिर्याद मोटर चालक गंगाधर पुजारी यांनी येरवडा पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.