पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणात एका गोष्टीने लक्ष वेधून घेतले म्हणजे बाल हक्क न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर करतांना 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला होता. याचा प्रतीकात्मक निषेध म्हणून पुणे युवक काँग्रेसने अपघाताच्या ठिकाणी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला शहरातील युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.