Pune Porsche Case: अल्पवयीन आरोपी मुलाच्या रक्ताचे नमुने घेतले. पण ते रक्ताचे नमुने तेथील डॉक्टरांनी कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले आणि दुसर्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने वापरण्यात आले आहेत, अशी धक्कादाय माहिती आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. ससून रुग्णालयाच्या फाॅरेन्सिक औषध आणि विषशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर श्रीहरी हरलोल आणि डॉक्टर अजय तावरे यांच्या सांगण्यावरून रक्ताचे नमुने बदलण्यात आले आहेत. हे स्पष्ट झालं असून या दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.