Ravindra Dhangekar: मागील आठवड्यात कल्याणीनगर येथे कार अपघातात दोन तरुणांना एका आलिशान गाडीने चिरडल्याची घटना घडली. या घटनेतील अल्पवयीन आरोपी हा मद्य पिऊन गाडी चालवित होता, अशी माहिती समोर आली. त्यानंतर शहरातील बार, पब्स वर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (२७ मे) काँग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे हे पुणे स्टेशन जवळील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात पोहोचले.
यावेळी अधिकारी पैसे घेत असल्याचा थेट आरोप करण्यात आला. या पबवर कारवाई होणार कधी? असा जाब विचारात अधिकार्यांना कोणत्या ‘पब’कडून किती पैसे मिळतात याची यादीच धंगेकरांनी यावेळी वाचवून दाखविली.