पुण्यातील अपघातानंतर अजित पवारांनी आयुक्तांना फोन केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टीकरण दिलं. अशा घटना घडल्यानंतर कोणाला पाठिशी घाला, असं माझ्या तोंडूनही निघत नाही. कोणच्याही राजकीय दबावाला बळी पडू नका असं आयुक्तांना सांगितलं असंही अजित पवार म्हणाले.