मागील आठवड्यात कल्याणीनगर येथे कार अपघातात दोन तरुणांना एका आलिशान कार ने चिरडल्याची घटना घडली.या घटनेतील अल्पवयीन आरोपी हा दारू पिऊन कार चालवित होता अशी माहिती समोर आली.त्यावेळी त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यामध्ये फेराफार झाल्याच स्पष्ट झाल्यानंतर, त्या प्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. श्रीहरी भीमराव हाळनोर, डॉ.अजय अनिरुद्ध तावरे आणि वॉर्ड बॉय अतुल नामदेव घटकांबळे या तिघांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केल्यावर या तिघा आरोपींना ३० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.