आज (२८ मे) पहाटे दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानामध्ये बाॅम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. त्यानंतर आपत्कालीन दरवाजाने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. विमान सुरक्षा आणि बाॅम्ब निकामी करणाऱ्या पथकाकडून सध्या तपासणी सुरू आहे.