लोकसभेनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेने यावेळी अभिजीत पानसे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला असून भाजपाचे निरंजन डावखरे हे या मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असं असतानाच अभिजित पानसे यांनी जे पदवीधर आमदार आहेत, त्यांनी बारा वर्षांत केलं काय? असा प्रश्न उपस्थित केल्याने अनेक चर्चा रंगल्या आहेत.