Sonia Duhan Speech: सोमवारी सोनिया दुहान या अजित पवारांनी बोलवलेल्या बैठकीत मागच्या दाराने उपस्थित राहिल्या होत्या. त्यामुळे शरद पवारांच्या विश्वासू शिलेदार सोनिया दुहान या अजित पवार गटात प्रवेश करतील अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर आता सोनिया दुहान यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण सुप्रिया सुळेंमुळे पक्ष सोडत असल्याचं त्या म्हणाल्या. तसंच सध्या कुठल्याही पक्षात जाणार नसल्यांचही त्यांनी स्पष्ट केलं.