पुणे अपघातानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना फोन केला होता. अजित पवार यांचा फोन जप्त करून नार्को टेस्टची मागणी दमानिया यांनी केली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे. पुण्यातील अपघात प्रकरणात आमच्या पक्षाला व नेत्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा सुपारी घेऊन उद्योग चालवला आहे, असं उमेश पाटील म्हणाले. तसंच दमानिया यांची नार्को टेस्टे करावी असंही ते म्हणाले.