पुण्यात १९ मे रोजी पोर्श कार अपघातात दोन संगणक अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना ससून रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि इतर दोघांना अटक करण्यात आली. डॉ. तावरे आणि अल्पवयीन आरोपीचे वडील यांच्यादरम्यान त्या रात्री रक्ततपासणीचे नमुने घेण्याच्या दोन तास आधी १४ वेळा फोनवरून संभाषण झाले असल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी (२८ मे) न्यायालयात दिली.