राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज मनुस्मृतीचं दहन करत आंदोलन केलं. त्यावेळी त्यावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोही फाडला गेला. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी केलेला या कृत्याचा निषेध सत्ताधारी पक्षाकडून व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी झालेल्या प्रकारावर स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे.