डॉ. अजय तावरे यांच्याकडून न्याय वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख चार्ज काढून घेतला असून विजय जाधव यांच्याकडे पदभार दिला आहे.तर शिपाई अतुल घटकांबळे याला निलंबित केले आहे. श्रीहरी हळनोर हे तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असल्याने 28 तारखेला त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. यापूर्वी देखील डॉ. अजय तावरे यांच्यावर आरोप झाले आहेत.तरी देखील त्यांना कोणाच्या आदेशानुसार सेवेत घेण्यात आले. तसेच अजय तावरे यांच्यावर होणार्या आरोपा बाबत मंत्री महोदय यांना रुजू करून घेतेवेळी माहिती दिली होती का या प्रश्नांच उत्तर ससूनचे अधिष्ठाता डॉ विनायक काळे यांना देता न आल्याने पत्रकार परिषदे मधून काढता पाया घेतला.