पुणे अपघात प्रकरणात कुठल्यातरी मंत्र्याने फोन केल्याची चर्चा आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अगरवाल नावाच्या बिल्डरची पार्टनरशिप कुठल्या-कुठल्या राजकीय पक्ष आणि मंत्र्यांबरोबर आहे? किंवा कुठल्या राजकीय मंत्र्यांचे पैसे त्यात अडकलेले आहेत याची चौकशी करावी, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी त्यांनी न्यायालयालाही कठोर कारवाईची विनंती केली आहे.