मेळघाटातील खडीमल गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहेत. टँकर आला की गावकऱ्यांची धावाधाव सुरू होते. टँकरवरच्या पाण्यावरून धक्काबुक्की होते म्हणून टँकर विहिरीत रिकामा केला जातो. हे पाणी काढण्यासाठी शेकडो हंडे, डबे विहिरीचे तळ गाठतात. तासभर जीवाची बाजी लावून गावकरी पाणी उपसत राहतात. या भीषण परिस्थितीचं वास्तव मांडणारा हा व्हिडीओ पाहा..