मनुस्मृती दहन आंदोलनावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर फाडलं गेलं. त्यावर राज्यभरात महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध नोंदवला जात आहे. अशातच सत्तेत असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आव्हाडांच्या बचावासाठी सरसावले आहेत. आव्हाडांवर टीका करत बसण्यापेक्षा आपण त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे, असं भुजबळ म्हणाले. तसंच शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे दोन श्लोक समाविष्ट करण्याच्या प्रस्तावालाही त्यांनी विरोध केला आहे .