पुण्यातील अपघात प्रकरणानंतर बार आणि पब्सचा मुद्दा पुन्हा एरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी आमदार रविंद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयाला भेट देत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं. मंत्री शंभूराज देसाईंवरही आरोप केले होते. त्यावर आक्रमक भूमिका घेत शंभूराज देसाईंनी धंगेकर आणि अंधारेंना कायदेशीर नोटीस बजावण्याचा इशारा दिला. त्यावर सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.