डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अनावधानाने फाडल्याप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली. त्यावर भाजपाचे आमदार प्रविण दरेकर यांनी भुजबळांची ही भुमिका दुर्दैवी असल्याचं म्हटलं. यावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका कायम ठेवली आहे.