विजेचा लपंडाव आणि नागरिकांकडून येत असलेल्या तक्रारी या अनुषंगाने शुक्रवारी (३१ मे) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयास अचानक भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्यांनी कार्यालयासमोरच ठिय्या मांडला होता.