लोकसभा निवडणुकीचा निकाल तीन दिवसांनी लागणार आहे. मात्र त्याआधीच आगामी विधानसभा निवडणुकीची चर्चा देखील सुरू झाली आहे. लोकसभेच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय मनोज जरांगेंनी केला होता. आता विधानसभेला उमेदवार देणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मनोज जरांगेंनी महत्त्वाचं विधान केलं आहे.