येथील श्री विठ्ठल मंदिरात एक तळघर आढळून आले. मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू आहे. फरशीचं काम करत असताना एक पोकळी दिसून आली. साधारणपणे पाच ते सहा फूट खोल एक खोली असून पुरातत्त्व विभागाने मंदिरात आढळलेल्या तळघराची पाहणी केली. यामध्ये विष्णूच्या दोन, तर महिषासुरमर्दिनी तसंच पादुका आणि दोन छोट्या मूर्ती आढळून आल्या आहेत. तसंच काही जुनी नाणीदेखील आढळल्याची माहिती आहे.