लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात पैसे वाटल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकाच्या रोखठोक या सदरात केला होता. या संदर्भात शिंदेंनी संजय राऊतांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यावर संजय राऊत यांनी भारतात परतल्यानंतर माध्यमांद्वारे प्रतिक्रिया देत माझ्याविरोधात खटला दाखल करावा, असं
आव्हान दिलं आहे.