पनवेलमध्ये अभिनेता सलमान खान यांचे फार्महाऊस आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पाखे यांना माहिती मिळाली होती की अभिनेते सलमान खान यांच्या पनवेलमधील फार्महाऊसवर काही लोकं रेकी करुन आले होते व सलमान खान यांचा घातपात करण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सोशलमीडिया, व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून माहिती हस्तगत केली. या माहितीची खातरजमा झाल्यानंतर २४ एप्रील रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान चार जणांना अटक केली होती. या आरोपींकडे काही संशयस्पद वस्तू सापडल्या असून त्याद्वारे अभिनेता सलमान खानचा घातपात करणार असल्याचं निष्पन्न झालं आहे. पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी ही माहिती दिली.