येत्या चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी इंडिया आघाडीतील नेत्यांची बैठक आज (१ जून) दिल्लीत पार पडली. बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पत्रकार परिषदेत बैठकीसंदर्भात माहिती दिली. तसंच आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या आकलनानुसार २९५ पेक्षा जागा येतील असं खरगे म्हणाले.