लोकसभा निवडणुकीचे निकाल येत्या चार जून रोजी लागणार आहेत. तत्पूर्वी शनिवारी (१ जून) एक्झिट पोल्स जाहीर झाले. यामधील विसंगतीवर बोट ठेवत, शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, …तर भाजपाला देशात ८०० जागा मिळायला हव्यात… आणि मग असे आहे तर १८० जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना फोन करून अमित शहांनी का धमकावलंय?