NAGPUR | सांगली मतदारसंघात काँग्रेसची कोंडी करून उद्धव ठाकरे यांच्या सेनेने उमेदवार दिला मात्र तिथे अपक्ष उमेदवार आघाडी घेईल, असा कौल एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळाला. त्या जागेवर चर्चा करू असं म्हणणाऱ्या आणि ७० वर्षांतील काँग्रेस शासनावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खडे बोल सुनावले. संजय राऊत ज्या शाळेत गेले ती काँग्रेसने निर्माण केलेली आणि संविधान वाचविणारीही काँग्रेसच होती, असे नाना पटोले म्हणाले.