कोकण पदवीधर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांनी कोकण दौऱ्यानंतर रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेतली आणि कोकणवासीयांच्या व्यथांना वाचा फोडली. कोकणातील तरुण बाहेरगावी, बाहेरच्या कंपन्या इथे आणि परप्रांतीय कोकणात अशी भीतीदायक अवस्था होईल, असे ते म्हणाले. तर रोजगाराला प्राधान्य देण्यासाठी आपण जाहिरनामा नाही तर रोजगारनामा प्रसिद्ध करू अशी घोषणाही त्यांनी केली.