लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा कौल मिळेल असा अंदाज आहे. तर महाराष्ट्रात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीची सरशी होणार असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर आमदार एकनाथ खडसे यांनी महायुतीचेच कान टोचले आहेत. महाराष्ट्रातील जनतेला फोडाफोडीचं राजकारण मान्य नाही, असं चित्र असल्याचं खडसे म्हणाले.