देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर १५ दिवसांत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर दिसतील, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं होतं. त्यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी रवी राणांना खोचक टोला लगावला आहे.