Lok Sabha Election Result: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. आज ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. यंदाची निवडणूक अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. त्यामुळे यंदा जनमताचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.