महाराष्ट्रात ४० पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा भाजपाकडून करण्यात आला होता. मात्र सध्या महाराष्ट्रातील चित्र पाहता भाजपापेक्षा महाविकास आघाडीने सरशी घेतल्याचं चित्र आहे. मोठा विजयाचा दावा करण्याऱ्या भाजपाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयाबाहेरील चित्र पाहता कार्यकर्ते जल्लोषाच्या प्रतीक्षेत असल्याचं चित्र आहे. या परिस्थितीचा घेतलेला हा आढावा.