रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजापाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे विजयी झाले आहेत. राणेंविरोधात विनायक राऊत निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे या अटीतटीच्या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. यावेळी नारायण राणेंच्या विजयानंतर आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला.