राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने बारामती मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. पवार विरुद्ध पवार अशा या लढतीत राष्ट्रवादी गटाच्या सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे. विजयानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. विजयानंतर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा अभिनंदनाचा फोन आला का? या प्रश्नावरही सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.