भाजपाचे नारायण हे राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. या विजयाचं श्रेय त्यांनी पक्ष, कार्यकर्ते आणि कुटुंबाला दिलं. मात्र हे सांगतानाच त्यांना काही आप्त, महायुतीतील सहकाऱ्यांचं कामकाज नांदा सौख्यभरेला शोभणारं नव्हतं, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. भाजपाच्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न झाला, असंही ते म्हणाले. त्यामुळे नारायण राणे यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? यावर आता चर्चा रंगली आहे.