पूर्णवेळ पक्षसंघटनेसाठी द्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्षश्रेष्ठींकडे करणार आहेत. महाराष्ट्रात भाजपाची झालेली पीछेहाट पाहता फडणवीसांनी सरकारमधून बाहेर पडण्याची विनंती केली. या चर्चेवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी यासंदर्भात आता महत्त्वाचं विधान केलं आहे.