लोकसभा निवडणुकीचा मंगळवारी (४ जून) निकाल जाहीर झाला. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला ९ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तसंच महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत. भाजपाच्या या अपयशाची चर्चा सध्या राज्यासह देशातही सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (५ जून) पत्रकार परिदष घेत भाजपाच्या पराभवाची कारणं सांगितली आहेत.