महाष्ट्रात भाजपाला अपेक्षित असं यश मिळालेलं नाही. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात भाजपाच्या झालेल्या पराभवाची संपूर्ण जबाबदारीही स्वीकारली आहे. तसंच आगामी विधानसभेसाठी पू्र्णवेळ पक्षासाठी काम करण्याची संधी द्यावी व सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंतीही फडणवीस पक्षश्रेष्ठींकडे करणार आहेत.