शिवराज्याभिषेक सोहळानिमित्त नाशिकमध्ये २ लाख ४१ हजार शर्टच्या बटनांचा वापर करून शिवरायांची अप्रतिम अशी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. येवला तालुक्यातील अनकुटे येथील विठ्ठल गायकवाड यांनी ही प्रतिकृती साकारली आहे.
बटन व धाग्यांचा वापर करत शिवरायाची प्रतिमा साकारण्याकरता गायकवाड यांना तीन वर्षे आठ महिन्यांचा कालावधी लागला आहे.