यंदा पंतप्रधान मोदींचा करिश्मा चालला नाही, अशी चर्चा तर खुद्द भाजपामध्येच सुरू आहे. परंतु, जेव्हा पराजयाची जबाबदारी घ्यावी लागते, तेव्हा स्थानिकांनाच जबाबदार धरले जाते या अनुभवामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठपका येण्याआधीच राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यातही हा राजीनामा नव्हे तर नाराजीनामा आहे, असेही बोलले जाते. फडणवीसांची कोंडी झाल्याने त्यांनी राजीनामा दिला की, त्यांच्या राजीनाम्याच्या कृतीने पक्षश्रेष्ठींची कोंडी झाली आहे की, दोघांचाही कोंडी या पराजयामुळे झाली आहे हा सध्या राजकारणातील चर्चेचा विषय आहे.