लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. या चिन्हांशी साम्य असलेले ‘पिपाणी’ चिन्ह अपक्ष उमेदवारांना दिले गेले. चिन्हांतील गोंधळामुळे पिपाणीला राज्यात दीड लाख मते पडली असून सातारा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे पराभूत झाले, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. याच मुद्द्यावर त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.