लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी एनडीच्या हालचाली वाढल्या आहेत. दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू आहे. गुरुवारी (६ जून) दिल्लीत एनडीएच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर आज नवनिर्वाचित खासदारांची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री शिंदे देखील दोन दिवस दिल्लीत आहेत. तर पक्षाचे नेते म्हणून पंतप्रधान मोदी यांची निवड एनडीए नेत्यांकडून करण्यात आली असल्याचंही शिंदे म्हणाले.