भाजपाकडे बहुमत नसल्याने मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावं लागणार आहे. त्याचबरोबर इंडिया आघाडीकडूनही सत्ता स्थापनेचा दावा केला जाण्याची चर्चा सुरू होती. मात्र आपला नरेंद्र मोदींबरोबर राहू असं विधान आता नितीश कुमार यांनी केलं आहे. एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीत ते बोलत होते.