लोकसभा निकालानंतर भाजपाप्रणित एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक आज दिल्लीत पार पडली. यावेळी जेडीयूचे नेते नितीश कुमार आणि तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर राहण्याची ग्वाही दिली. त्यानंतर काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना संबोधित करत मित्रपक्षांचे आभार मानले. तसंच लोकसभेत मिळालेल्या यशावरून विरोधकांवर टीकास्त्रही डागलं.