सून रक्षा खडसे यांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागणार याची खबर येताच ज्येष्ठ राजकरणी एकनाथ खडसे भावून झाले. गेल्या अनेक वर्षांपासून घेतलेल्या परिश्रमाचे चीज रक्षा खडसे यांच्या मंत्रीपदाच्या माध्यमातून होत आहे. आयुष्यातील सर्वात आनंदाच्या क्षणांपैकी हा एक क्षण असून आनंदाश्रू आवरले जात नाहीत, अशा शब्दांमध्ये त्यांनी भावपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी दिल्लीस जात असल्याचेही ते म्हणाले.