पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (९ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र या मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान दिलेलं नाही. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.