पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाला संधी न मिळाल्याने अनेक चर्चा रंगल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून शिंदे आणि अजित पवार गटावर चांगलचं तोंडसुख घेतलं. यावेळी त्यांनी अजित पवार गटाला मंत्रिपद न मिळण्याचं कारण सांगताना प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेत मोठा दावाही केला आहे.