लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळणार आहेत. आज (१० जून) दिल्लीत त्यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकरला. त्यांनतर प्रथम त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला. पंतप्रधान किसान निधीच्या १७व्या हप्त्याला त्यांनी मंजुरी दिली आहे.