लोकसभा निवडणुकीत देशात एनडीएला जरी बहुमत मिळालं असलं, तरी महाराष्ट्रात मात्र महायुतीला मोठा फटका बसला आहे. यावर बोलताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीतील नेत्यांनाच चिमटा काढला आहे. मुंबईत एवढं आपण काम केलं, विकास केला. मात्र निर्भय यश किती मिळालं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सोमवारी (१० जून) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते.