माझं कठोर आमरण उपोषण सुरु आहे. एका बाजूला मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी बैठका घेवू, अशी चर्चा सरकारकडून सुरू आहे. मात्र अशा चर्चा करून सरकारकडून गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव असल्याचा अंदाज आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.